सार्वजनिक वाचनालय, कन्हान येथे “वाचन प्रेरणा दिवस” साजरा
कन्हान : - कन्हान शहरातील हनुमान नगर येथील सार्वजनिक वाचनालयात बुधवार रोजी भारतरत्न , माजी राष्ट्रपती व मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ९४ व्या जयंती चे औचित्य साधुने “वाचनध्यास” या उपक्रमांतर्गत वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला .
कार्यक्रमाचे अध्यक्ष गंगाधरराव अवचट होते. प्रमुख अतिथी म्हणून एन.के. खानजोडे गुरुजी , किशोरराव इंगळे , वासुदेवराव चिकटे उपस्थित होते . वाचनालयाचे सभासद , वाचक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमालार्पणाने झाली . त्यानंतर सर्व उपस्थितांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
कोषाध्यक्ष दिनकरराव मस्के यांनी प्रास्ताविकातून डॉ.कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनाविषयी मार्गदर्शन केले . अध्यक्ष व प्रमुख अतिथी तसेच अभिषेक निमजे , राहुल पारधी यांनी “पेपर बॉय ते शास्त्रज्ञ व राष्ट्रपती” असा कलाम यांचा संघर्षमय जीवनप्रवास उलगडून दाखवला .
यानंतर सर्व उपस्थितांनी वाचन प्रेरणा दिवस निमित्त ग्रंथ प्रदर्शनातील पुस्तके पाहून सामूहिक वाचन केले .
कार्यक्रमात समीर खंडाते , रजत पाटील , रमण चव्हाण , आकाश गुप्ता , सुमित घोरपडे , राकेश पाटील , पवन सरोदे , शुभम शेंडे , स्वप्निल भिलावे , सौ. अल्का कोल्हे , सौ.पुष्पा बरलेवार , कुमारी मंजरी पडोळे , चेतना भोयर , लोकेश्वरी भोयर , पूजा ठाकरे , युवानी कोल्हे , फाल्गुनी माहोरे , आकांशा बरीये , सौ. कांचन पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन सचिव मनोहर कोल्हे यांनी केले , तर आभार प्रदर्शन श्याम बारई यांनी केले . शेवटी उपस्थितांना अल्पोहार , मिठाई व फळांचे वितरण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर



0 टिप्पण्या